हळू हळू हलवा ग बाळ भीमाचा पाळणा (४)
गोड अंगाई गाते भिमाई जोजावी राजनंदना
हळू हळू हलवा ग बाळ भीमाचा पाळणा ||ध्रु||
नव युगाचा हा लडिवाळ न्याहळती रामजी सकपाळ
सुलक्षणी ग बहुगुणी ग सफल झाली कामना
हळू हळू हलवा ग बाळ भीमाचा पाळणा ||१||
हळूच खुदकन गली हसतो क्रांतीसुर्य जणू भासतो
रूप तेजस्वी डोळे दिपावी महू गावाचा पाहुणा
हळू हळू हलवा ग बाळ भीमाचा पाळणा ||२||
मीरा आत्याचा किती जिव्हाळा दृष्ट न लागो माझ्या बाळा
मीठ मोहरी अलगद उतरी भोळी भाबडी भावना
हळू हळू हलवा ग बाळ भीमाचा पाळणा||३||
कुंदना तनमन झाले धुंद आज मावेना गगनी आनंद
परंपरेच्या गुलामगिरीच्या मुक्त करील तो बंधना
हळू हळू हलवा ग बाळ भीमाचा पाळणा||४||