जयंती सणाला
वर्षानं माझ्या माहेरा, चालेले मी जयंती सणाला
जयंती सणाला ग जयंती सणाला
जयंती सणाला ग जयंती सणाला ||ध्रू||
माझ्या ग माहेरची, ती जयंती निराळी
किलबिल पाखरांची, जमतील लेकीबाळी
दारात ज्याच्या त्याच्या, दिसेल ग रांगोळी
घरात ज्याच्या त्याच्या, होई पुरणाची पोळी
होई पुरणाची पोळी
सगळीकडे रोषणाई न, शोभा किती येते अंगणाला (२)
जयंती सणाला ग जयंती सणाला
वर्षानं माझ्या माहेरा, चालेले मी जयंती सणाला ||१||
निळ्या निळ्या पताका झुलतात ग वाऱ्यांन
गातोय जणू वारा भीमजयंतीच गानं
ती टोपी निळे फेटे निळे ते गावरान
झेंडा निळा नभात निळे ते आसमान
निळे ते आसमान
चैतन्य स्वाभिमानचे, झोप नसते बंधु कुंदणाला (२)
जयंती सणाला ग जयंती सणाला
वर्षानं माझ्या माहेरा, चालेले मी जयंती सणाला ||२||
वर्षानं माझ्या माहेरा, चालेले मी जयंती सणाला
वर्षानं माझ्या माहेरा, चालेले मी जयंती सणाला
जयंती सणाला ग जयंती सणाला
जयंती सणाला ग जयंती सणाला
गायक- आनंद शिंदे
गीतकार- कुंदन कांबळे
No comments:
Post a Comment