Sunday, April 6, 2025

भीमरायची आली वरात

भीमरायची आली वरात


सनई ताशाच्या  मंगल सूरात 

हो भीमरायची आली वरात ||

नाव वर्षाची राम लहान 

नाकी डोळी  सुंदर छान 

बघती  सारे डोळे भरून 

कौतुक करती गोड  मुखान 

सौख्य देईल सदा  संसारात 

भीमरायची आली वरात ||१||

जमल्या सगळ्या आया बाया 

नाव रमाला सांगती घ्याया 

कान आतुरले नाव ऐकाया  

लागली जेंव्हा राम लाजाया 

चंद्रमुख तिचे लपवी पदरात 

भीमरायची आली वरात ||२||

नवरा नवरी खांद्यावरती 

वाजत गाजत नाचत आणती 

मुंडावळ्या  त्या झुलती डुलती 

बाशिंग ती चमचम करती 

चांदनं  पडलं  जणू अंधारात 

भीमरायची आली वरात ||३||

सनई ताशाच्या  मंगल सूरात 

हो भीमरायची आली वरात ||


गायक- आनंद शिंदे 

No comments:

Post a Comment