Friday, May 9, 2025

हे खरंच आहे खरं 

हे खरंच आहे खरं 

हे खरंच आहे खरं 

हे खरंच आहे खरं 

की भीमराव  रामजी आंबेडकर 

बाबासाहेब आंबेडकर, नाव हे गाजतय  जगभर || ध्रू ||


महाविरोध कवटाळिला 

सारा समाज सांभालीला 

कोटी कोटी कहा उद्धार केला हो 

शिरी बांधिला मानाचा शेला 

अंधरूढीला गुलामगिरीला लावलिया कातर 

बाबासाहेब आंबेडकर, नाव हे गाजतय  जगभर ||१ ||


जाती भेदाच्या तोडिल्या तोफा 

मार्ग सत्याचा दविला सोपा 

आम्हा बांधून ठेवलाय खोपा हो 

बौद्ध धर्माचा टांगलाय सोफा 

जाणून महती सुखाणं जगती 

दलीतांची लेकरं 

बाबासाहेब आंबेडकर, नाव हे गाजतय  जगभर ||२||


भारताला जी होती हवी 

अशी लिहिली घटना नवी 

नवज्ञानाचा होता रवी हो 

काय वर्णावी ही थोरवी 

जोवर धरती हरेंद्र कीर्ती राहील अजरामर 

बाबासाहेब आंबेडकर, नाव हे गाजतय  जगभर ||३||




No comments:

Post a Comment