VIP खाणार VIP राहणार
आरं, व्हीआयपी खाणार व्हीआयपी राहणार
व्हीआयपी मानसं नमान
बाबसाहेबानं दिल, बाबसाहेबानं दिल ||ध्रू ||
भिमामुळ बदलली ही जिंदगी ही खास
आज इस्त्रीचे कापड, त्याला अत्तराचा वास (२)
भारीतला सूट अन भारीतला बूट
अंगावरी सोननणं
बाबसाहेबानं दिल, बाबसाहेबानं दिल ||१||
आर जीर्ण चालीरीतीची चाल ही बुडवली
वाया गेली असती पिढी माझ्या भिमानं घडवली (२)
भल्याभल्याला निवडून आनतुस करूनिया मतदान
भल्याभल्याला निवडून आनतुस करूनिया मतदान
हेबी बाबसाहेबानं दिल, बाबसाहेबानं दिल ||२ ||
आर आठव जरा कळतो कुणी जवळ येत नव्हती
आज गर्दीच्या गर्दी ह्या साजन विशाल च्या भोवती (२)
आज लाखा लाखानं घेऊन गातं बेंद्रेच पोरगं गाणं
हेबी बाबसाहेबानं दिल, बाबसाहेबानं दिल ||३||
Singer- Sajan Bendre
No comments:
Post a Comment