Monday, May 26, 2025

बाळ भीमाचा पाळणा


हळू हळू हलवा ग बाळ भीमाचा पाळणा (४)

गोड अंगाई गाते भिमाई जोजावी राजनंदना

हळू हळू हलवा ग बाळ भीमाचा पाळणा ||ध्रु||


नव युगाचा हा लडिवाळ न्याहळती रामजी सकपाळ

सुलक्षणी ग बहुगुणी ग सफल झाली कामना 

हळू हळू हलवा ग बाळ भीमाचा पाळणा ||१||


हळूच खुदकन गली हसतो क्रांतीसुर्य जणू भासतो

रूप तेजस्वी डोळे दिपावी महू गावाचा पाहुणा 

हळू हळू हलवा ग बाळ भीमाचा पाळणा ||२||


मीरा आत्याचा किती जिव्हाळा दृष्ट न लागो माझ्या बाळा

मीठ मोहरी अलगद उतरी भोळी भाबडी भावना

हळू हळू हलवा ग बाळ भीमाचा पाळणा||३||


कुंदना तनमन झाले धुंद आज मावेना गगनी आनंद 

परंपरेच्या गुलामगिरीच्या मुक्त करील तो बंधना 

हळू हळू हलवा ग बाळ भीमाचा पाळणा||४||



Wednesday, May 14, 2025

प्रबुद्ध हो मानवा

कनाकनानी  ज्ञान वेचुणी 
प्रबुद्ध हो मानवा 
प्रज्ञे चा ही प्रकाश दाविल 
मार्ग तुला रे नवा
प्रबुद्ध हो मानवा ||ध्रू||  

सिद्धार्थाच्या हृदयांतरी
ही ज्ञानज्योत चेतली
बुद्धमुखाने ह्या ज्योतीची
प्रभा जगी फाकली
त्या दीपाने तूही चेतवी
तव हृदयीचा दिवा
प्रबुद्ध हो मानवा ||१||

धम्मचिंतनी आचरणाची
कळेल तुज संहिता
अष्टमार्ग हे निश्चित
नेतील बुद्धत्त्वाच्या पथा
पंचशीलेचा निवास हृदयी
निर्वाणास्तव हवा
प्रबुद्ध हो मानवा ||२||

मनोभूमीतुनी तुझ्या
रुजावा बोधिवृक्ष हा पुन्हा
त्या शाखेची शीतल छाया
लाभावी बहुजना
करुणाप्रेरित कार्य तुझे
हे संजीवन दे जीवा
प्रबुद्ध हो मानवा ||३||

 

Saturday, May 10, 2025

जयंती सणाला 

वर्षानं माझ्या माहेरा, चालेले मी जयंती सणाला 
वर्षानं माझ्या माहेरा, चालेले मी जयंती सणाला 
जयंती सणाला ग जयंती सणाला
जयंती सणाला ग जयंती सणाला ||ध्रू|| 

माझ्या ग माहेरची, ती जयंती निराळी 
किलबिल पाखरांची, जमतील लेकीबाळी 
दारात ज्याच्या त्याच्या, दिसेल ग रांगोळी  
घरात ज्याच्या त्याच्या, होई पुरणाची पोळी 
होई पुरणाची पोळी 
सगळीकडे रोषणाई न, शोभा किती येते अंगणाला (२) 
जयंती सणाला ग जयंती सणाला
वर्षानं माझ्या माहेरा, चालेले मी जयंती सणाला ||१||

निळ्या निळ्या पताका झुलतात ग वाऱ्यांन  
गातोय जणू वारा  भीमजयंतीच गानं 
ती टोपी निळे फेटे निळे ते गावरान  
झेंडा निळा  नभात निळे ते आसमान 
निळे ते आसमान 
चैतन्य स्वाभिमानचे,  झोप नसते बंधु कुंदणाला (२) 
जयंती सणाला ग जयंती सणाला
वर्षानं माझ्या माहेरा, चालेले मी जयंती सणाला ||२|| 

वर्षानं माझ्या माहेरा, चालेले मी जयंती सणाला 
वर्षानं माझ्या माहेरा, चालेले मी जयंती सणाला 
जयंती सणाला ग जयंती सणाला
जयंती सणाला ग जयंती सणाला


गायक- आनंद शिंदे 
गीतकार- कुंदन कांबळे 




Friday, May 9, 2025

हे खरंच आहे खरं 

हे खरंच आहे खरं 

हे खरंच आहे खरं 

हे खरंच आहे खरं 

की भीमराव  रामजी आंबेडकर 

बाबासाहेब आंबेडकर, नाव हे गाजतय  जगभर || ध्रू ||


महाविरोध कवटाळिला 

सारा समाज सांभालीला 

कोटी कोटी कहा उद्धार केला हो 

शिरी बांधिला मानाचा शेला 

अंधरूढीला गुलामगिरीला लावलिया कातर 

बाबासाहेब आंबेडकर, नाव हे गाजतय  जगभर ||१ ||


जाती भेदाच्या तोडिल्या तोफा 

मार्ग सत्याचा दविला सोपा 

आम्हा बांधून ठेवलाय खोपा हो 

बौद्ध धर्माचा टांगलाय सोफा 

जाणून महती सुखाणं जगती 

दलीतांची लेकरं 

बाबासाहेब आंबेडकर, नाव हे गाजतय  जगभर ||२||


भारताला जी होती हवी 

अशी लिहिली घटना नवी 

नवज्ञानाचा होता रवी हो 

काय वर्णावी ही थोरवी 

जोवर धरती हरेंद्र कीर्ती राहील अजरामर 

बाबासाहेब आंबेडकर, नाव हे गाजतय  जगभर ||३||




Monday, May 5, 2025

VIP खाणार VIP  राहणार 


आरं, व्हीआयपी खाणार व्हीआयपी राहणार

व्हीआयपी मानसं  नमान 

बाबसाहेबानं   दिल, बाबसाहेबानं  दिल ||ध्रू ||


भिमामुळ बदलली ही जिंदगी ही खास 

आज इस्त्रीचे कापड, त्याला अत्तराचा वास (२) 

भारीतला   सूट अन भारीतला  बूट 

अंगावरी सोननणं 

 बाबसाहेबानं   दिल, बाबसाहेबानं   दिल ||१||


आर जीर्ण चालीरीतीची चाल ही बुडवली 

वाया गेली असती पिढी माझ्या भिमानं  घडवली (२) 

भल्याभल्याला निवडून आनतुस  करूनिया मतदान 

भल्याभल्याला निवडून आनतुस  करूनिया मतदान 

हेबी बाबसाहेबानं   दिल, बाबसाहेबानं   दिल ||२ ||


आर आठव  जरा कळतो कुणी जवळ येत नव्हती 

आज गर्दीच्या गर्दी ह्या साजन  विशाल च्या भोवती (२) 

आज लाखा लाखानं  घेऊन गातं   बेंद्रेच  पोरगं  गाणं  

हेबी बाबसाहेबानं दिल, बाबसाहेबानं दिल ||३||


Singer- Sajan Bendre