Saturday, April 26, 2025

 एक चमत्कार  व्हावा


एक चमत्कार  व्हावा, एक जादुच व्हावी 

याव गगनातून  खाली एक विमान 

त्यातून उतरावं  माझ्या भिमान, भिमान (४) || ध्रू ||


निळ्या निळ्या  आकाशातून विमानातून  भीम फिरे (२)  

पावसाची सर  नाही पडतील मोती हीरे 

प्रवास झाला  माझा  छान , साहेब हरला माझा भान (२) 

अस सांगाव माता  रमानं , लय  आनंदान  सांगाव माझ्या रमानं

 त्यातून उतरावं  माझ्या भिमान, भिमान ||१||


सूट बोट कोट आणि संविधान हातात 

अमृत वाहते जणू बा भीमाच्या  पेनात 

सूर्य ताऱ्यांचा साज, ढोल ताश्याच्या आवाज 

स्वागताला याव रामजी बाबानं  (२) 

त्यातून उतरावं  माझ्या भिमान, भिमान ||२ ||


Sunday, April 6, 2025

भीमरायची आली वरात

भीमरायची आली वरात


सनई ताशाच्या  मंगल सूरात 

हो भीमरायची आली वरात ||

नाव वर्षाची राम लहान 

नाकी डोळी  सुंदर छान 

बघती  सारे डोळे भरून 

कौतुक करती गोड  मुखान 

सौख्य देईल सदा  संसारात 

भीमरायची आली वरात ||१||

जमल्या सगळ्या आया बाया 

नाव रमाला सांगती घ्याया 

कान आतुरले नाव ऐकाया  

लागली जेंव्हा राम लाजाया 

चंद्रमुख तिचे लपवी पदरात 

भीमरायची आली वरात ||२||

नवरा नवरी खांद्यावरती 

वाजत गाजत नाचत आणती 

मुंडावळ्या  त्या झुलती डुलती 

बाशिंग ती चमचम करती 

चांदनं  पडलं  जणू अंधारात 

भीमरायची आली वरात ||३||

सनई ताशाच्या  मंगल सूरात 

हो भीमरायची आली वरात ||


गायक- आनंद शिंदे